|| भारत अमुचा देश ||
भारत अमुचा देश आम्हा असे अभिमान
जन्मा आलो येथे आम्ही किती भाग्यवान
जरी भिन्नता ,जरी विविधता
येथे परंतु नांदे एकता
पवित्र,उन्नत आमची ही संस्कृती महान
फळाफुलांची हरीत वनांची
नदी शिखरे जलाशयांची
सुंदर संपन्न भुमी ही आम्हा जीव की प्राण
बलवंताची शिलवंताची
प्रज्ञावंत अन गुणवंताची
वंदनीय जगती जे त्या नररत्नांची ही खाण
हे सविंधान तिरंगी निशाण
अमुचा मान अमुची शान
प्रियतम या भारतभुमीचे गातो आम्ही जयगान
- शरद कांबळे
No comments:
Post a Comment